“दो बुंद जिंदगी के' पोलिओ लस अभियानाला सुरुवात

घुग्घुस : देशातून पोलियोला हद्दपार करण्यासाठी शासना तर्फे वर्षातून दोन वेळा पल्स पोलियो लस ड्रॉप स्वरूपात दिल्या जाते. 31 जानेवारी रोजी घुग्घुस प्राथमिक केंद्र अंतर्गत येणाऱ्या 15 गावामध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जवळपास साडे सात हजार बालकांना पोलिओ लस दिल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी वाकटकर यांनी दिली.

यामध्ये 0 ते 5 वर्षांच्या मुलां – मुलींना पल्स पोलिओची लस देण्यात आली.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना सोबत घेऊन संपूर्ण घुग्घुस परिसरातील अंगणवाडी,बस स्थानक, मुख्य चौक व विविध सार्वजनिक ठिकाणी लस देण्यात आले.

घुग्घुस कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष राजूरेड्डी अंगणवाडी सेविका सौ.अर्चना बेहरे यांच्या हस्ते गजानन महाराज मंदिर येथे बालकांना पोलिओ लस देऊन पोलिओ लसीकरणाची सुरुवात केली. यावेळेस सामाजिक कार्यकर्ते बालकिशन कुळसंगे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments