BREAKING : राजु यादव हत्याकांडातील आरोपींना राजुरा पोलीसांकडून अटक


राजुरा (चंद्रपूर) :
येथील  वर्दळीचे ठिकाण असलेल्या नाका नंबर ३ परिसरातील मयुर हेअर सलून येथे केस कापत असलेल्या कोळसा वाहतुक ट्रॅक चालक मालक असोसिएशन चा अध्यक्ष  राजू यादव (वय ४५ वर्षे) याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सदर घटना दिनांक ३१ जानेवारी ला सायंकाळी ६ च्या सुमारास घडली होती. राजुरा पोलीसांनी ताबडतोब चौकशीची सुत्रे हलवून आरोपींना अवघ्या दोन तासांत अटक करण्यात यश मिळविले. 
         आरोपींचे चंदन सितलाप्रसाद सिंग (वय ३०) जवाहर नगर, सत्यंद्र कुमार परमहंस सिंग (वय २८) हनुमान नगर रामपूर अशी असून यावर कलम ३०२, ३४ भादंवि ७/२७ नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे. घटनेप्रसंगी आरोपींनी वापरलेली दुचाकी एम एच ३४, बी टी - २५२४ आणि पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. 
    बल्लारपूर वेकोली अंतर्गत राजुरा परिसरात वेकोळीच्या खुल्या व भु-अंतर्गत खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. या ठिकाणी कोळशाची वाहतूक करताना व कोळसा उचल करताना वाहनाचा नंबर  लवकर लावण्याच्या नादात अनेकदा वाद निर्माण झालेले आहे. कधी कधी तलवारी सुद्धा निघालेल्या आहे. मात्र यावेळेस आरोपीनी यापूर्वीच बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यानुसार सायंकाळच्या सुमारास केस कापण्यासाठी राजुरा येथील वर्दळीचे ठिकाण असलेल्या नाका नंबर तीन येथे केस कापण्यासाठी आलेल्या राजू यादव यांच्यावर मोटार सायकलवरुन आलेल्या आरोपींनी गावठी कोट्यातून चार गोळ्या झाडून त्यांची हत्या केली व वाहन सोडून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक गोळा झाले तोपर्यंत आरोपी पसार झाले होते यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
      सदर कारवाई राजुराचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजासिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे, पोलिस शिपाई श्रीकांत चन्ने, चेतन टेंभुर्णे आणि टिम करीत आहेत. दरम्यान खुन झालेल्या मयुर सलून आणि आरोपी राहत असलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
     

 : प्रथमदर्शनी सास्ती - राजुरा, बल्लारपूर येथे कोळसा खानीत होणाऱ्या कोळसा व्यापारातून व यासंबंधीत वादातून सदर खून झाल्याचा संशय आहे. मारेकऱ्यांनी पिस्तूलीचे चार राऊंड फायर केले होते. घटनेत वापरलेले पिस्तूल, दुचाकी आणि दोन आरोपी ताब्यात घेतले असून अधिक तपास केल्यानंतर यासंदर्भात अधिक माहिती देता येईल. : चंद्रशेखर बहादुरे, पोलीस निरीक्षक राजुरा

Post a Comment

0 Comments