विजय क्रांती कामगार संघटनेची पालकमंत्री वड्डेटीवारांसाठी देवाकडे साकडे



नांदा फाटा :  राज्याचे कांग्रेसचे वजनदार नेते आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वड्डेटीवार यांना नुकतीच काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या चाहत्या वर्गात,कार्यकर्त्यांत कमालीचा असंतोष पहायला मिळतो आहे.

ते परत जनतेचे प्रेम व आशीर्वादाने लवकर बरे होऊन जनसेवेत दाखल व्हावे याकरीता जिल्हयातील अनेक कार्यकर्त्यासह चाहत्यानी देवाला साकडे घातले आहे
आवाळपुर अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड येथील विजय क्रांती कामगार संघटनेच्या पदाधिकारी व कामगारांनी सुद्धा नांदा फाटा येथील श्रीवास्तव कॉलोनी येथील शिव मंदिर येथे हवन करत पूजा करून प्रार्थना करत पालकमंत्री लवकर बरे व्हावे याकरिता देवाला साकडे घातले.

कोरोना काळात येथील सिमेंट कारखान्यातील कंत्राटी कामगारांवर होणारा अन्याय यावर स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विजय वडडेट्टीवार यांनी कामगारांची भेट घेऊन अल्ट्राटेक व्यवस्थानाशी चर्चा करीत खडेबोल सूनवत कामगारांच्या मागण्या संदर्भात तंबी देत खडसावले होते त्यामुळे कामगार वर्गात आनंदाची लाट पसरली होती मात्र त्यांनतर काही दिवसातच पालमंत्री कोरोना पोसिटीव्ह आल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

त्यामुळे साहेब लवकर बरे व्हावे आणि जनसेवेत दाखल व्हावे याकरीता अनेक कार्यकर्ते देवाला साकडे घालत आहे यावेळी नांदा फाटा येथील श्रीवास्तव शिवमंदिर येथे हवन करतांना विजय क्रांती कामगार संघटनेचे पदाधिकारी सुनील ढवस,दशरथ राऊत यांच्यासह दिलीप झाडे,अनिल खोके,अरविंद इंगोले,विलास निब्रड,हरी मोरे,आरिफ शेख,संजय पोहोणकर, विलास डाहूले,वाभीटकर इत्यादी सदस्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments