चंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली




24 तासात 1133 कोरोनामुक्त, ॲक्टीव पॉझिटिव्ह 14,646

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 1618 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. तर विक्रमी संख्येने 1133 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आज शनिवारी मृत्यूची संख्या घटली असली तर बाधितांची संख्या उच्चांकी आकड्याने वाढली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 51 हजार 112 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 35 हजार 712 झाली आहे. सध्या 14 हजार 646 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 53 हजार 72 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 95 हजार 807 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 45 व 39 वर्षीय पुरुष, भिवापुर येथील 67 वर्षीय महिला, गोपाल पुरी येथील 61 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 60 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 38 व 53 वर्षीय पुरुष. वरोरा तालुक्यातील 58 व 78 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, सरदार पटेल वार्ड येथील 64 वर्षीय महिला. गोंडपिपरी तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय महिला .नागभीड तालुक्‍यातील 55 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील 43 वर्षीय महिला 65‌ व 70 वर्षीय, सावरगाव येथील 36 वर्षीय पुरुष. लाखांदूर येथील 65 वर्षीय महिला.बल्लारपूर येथील 80 वर्षीय पुरुष.भद्रावती येथील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 754 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 696, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 25, यवतमाळ 22, भंडारा सहा, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1618 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 587, चंद्रपूर तालुका 140, बल्लारपूर 101, भद्रावती 100, ब्रम्हपुरी 106, नागभिड 77, सिंदेवाही 19, मूल 30, सावली 32, पोंभूर्णा 37, गोंडपिपरी 12, राजूरा 36, चिमूर 50, वरोरा 172, कोरपना 89, जिवती 16 व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments