पेट्रोल – डिजल – गॅस दरवाढी निषेधार्थ 11 फरवरी रोजी काँग्रेसचा निषेध मोर्चा

घुग्घुस : “अच्छे दिन आयेगे ‘ बहोत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार असे गाजर दाखवीत सत्तेत आलेल्या श्रीमंत व उद्योगपतीच्याच विकासासाठी झटणाऱ्या या भाजप सरकारने पेट्रोल – डिजल – गॅसच्या किमतीत भंयकर अशी दरवाढ करून देशातील सर्व सामान्य नागरिकांचे जगणेच कठीण केले आहेत.

कोरोना काळात रोजगार गमावलेल्या नागरिकांना छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्या ऐवजी हजारो कोटीचे पॅकेज जाहीर करून फसविले व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कचच्या तेलाची किंमत कवडीमोल झाली असतांना नागरिकांना कमी किमतीत पेट्रोल – डिजल देण्या ऐवजी इतिहासात कधी न झालेले पेट्रोल व डिजल दर एकसमान करून देशाच्या नागरिकांची लूट केली व दररोज पेट्रोल – डिजल, स्वयंपाक गॅसचे किमतीत वाढ करून नागरिकांच्या खिश्यावर उघड दरोडा घालणाऱ्या या सरकारचे निषेध नोंदविण्या करीता दिनांक 11 फरवरी रोजी दुपारी 03 वाजता निघणाऱ्या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने शामिल व्हावे असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, रोशन पचारे (किसान सेल जिल्हाध्यक्ष) पवन आगदारी (अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष) सैय्यद अनवर (कामगार नेते) तौफिक शेख (युवक अध्यक्ष)सुरज कन्नूर (युवा नेते) तसेच शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, किसान सेल, अनुसूचित जाती विभाग काँग्रेस यांनी केले आहे



Post a Comment

0 Comments