पोर्टल धारकांनो खबरदार - जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे


चंद्रपूर : देशात गाजत असलेल्या सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी अनेक वृत्तवाहिन्यांनी व डिजिटल न्यूज पोर्टल धारकांनी रिया चक्रवर्ती यांच्याबाबत अनेक अर्वाच्य भाषेत लिखाण करून त्यांची बदनामी केली, महिलांचा अनादर होऊ नये यासाठी वृत्तवाहिनी व डिजिटल पोर्टल धारकांनी सावधानता बाळगावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिले आहे.
देशात, राज्यात व जिल्ह्यात अश्या अनेक घटना घडत आहे, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता परंतु सध्या वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे.
सध्या काही वृत्तवाहिनी व डिजिटल पोर्टल धारक अर्वाच्य भाषेत लिखाण करून महिलांची बदनामी करीत आहे, यापुढे कोणत्याही प्रकरणात महिलांबाबत अर्वाच्य भाषेत लिखाण झाले व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाईचे संकेत जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिले आहे.

Post a Comment

2 Comments