‘सारे जहां से अच्छा हिंदुस्थान हमारा’ गणतंत्र दिवशी कोवीड योद्धाचा सन्मान



न्यू लाईफ चॅरिटेबल ट्रस्टचे उत्कृष्ट कार्यक्रम

घुग्घुस :  72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त न्यू चॅरिटेबल ट्रस्ट तथा संयुक्त खदान संघ यांच्या वतीने टेम्पो क्लब घुग्घुस येथे सांयकाळी 06 वाजता कोविड – 19 शौर्य योद्धा सन्मान कार्यक्रम घेण्यात आले.
यामध्ये सर्व धर्म समभाव व सामाजिक एकतेचे संदेश देण्यात आला मंचावर हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई धर्माच्या धर्मगुरूंना मंचावर प्रमुख अतिथी म्हणून बसविण्यात आले.



यासोबतच घुग्घुस पोलीस स्टेशनचे पोलीस उप – निरीक्षक संजय सिंग, पोलीस उप – निरीक्षक मेघा गोखरे, काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेर्ळीस वैद्यकीय टीम, हेलपिंग हँडस संघटना, आशा वर्कर, पोलीस प्रशासन, आर्यन फ्रेंड्स क्लब, गिव्ह मी ब्लड सेव लाईफ, व अन्य संघटनेचे सदस्य व पदाधिकारी कोरोना योद्धाचा सन्मान करण्यात आले.

यावेळेस देशभक्तीपर गीत व नृत्याचे आयोजन करण्यात आले. सूत्र संचालन सुनील माहुरे गुरुजी यांनी केले तर प्रास्तविक विजय अद्दूरवार यांनी केले.

Post a Comment

0 Comments