शुभमनेच स्वतः च्या अपहरणाची दिली होती ऑफर ?

● आरोपी गणेश पिपळशेंडेचा खळबळजनक खुलासा 

● 'लॉय डिटेक्टर' चाचणीत आज उघड होईल सत्यता
● शुभम हत्याकांडात नवनवीन खुलासे

घुग्घूस (चंद्रपूर) : येथील रामनगर वेकोली शुभम दिलीप फुटाणे हत्याकांडात अटकेत असलेल्या आरोपीकडून नवनवीन खुलासे होत आहे.  आरोपी गणेश पिंपळशेंडे याने पुन्हा एक नवीनच खुलासा करून या घटनेला वेगळे वळण दिले. आरोपीच्या नवनवीन खुलासामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत असून आज 20 फेब्रुवारी 2021 ला आरोपीची ' 'लॉय डिटेक्टर' चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चाचणी नंतर शुभम हत्याकांड प्रकरणातील  सत्यता बाहेर येणार आहे. 

 सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शुभम फुटाणे यांच्या वडिलांना शेतीच्या विक्रीतून तीस लाख रुपये मिळणार होते.
त्यातील दहा लाख रुपये शुभमच्या वडीलानी घरी आणले असल्याचे शुभमला माहीत होते. शुभमने गणेश सोबत दारू पीत असतांना अपहरणाची ऑफर दिली.  दहा पैकी सात लाख मी ठेवतो व तीन लाख तुला देतो असे सांगितले मात्र कुठल्याही तरी गोष्टी वरून दोघात बाचा - बाची होऊन झालेल्या मारहाणीत  शुभमची मृत्यू झाल्याचे आरोपी गणेश पिपळशेंडे आपल्या बयानात पोलिसांना सांगत आहे.  त्यामुळे आज शनिवारी आरोपीचा होणाऱ्या लॉय डिटेक्टर चाचणीत सत्य उघड होण्याची शक्यता आहे.

शुभम हत्याकांड प्रकरणाचा हत्या झाल्यापासूनचा संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या देख - रेखीत होत असून संपूर्ण पोलीस यंत्रणे साठी हे मर्डर मिस्ट्री आवाहन झाले आहे.



Post a Comment

0 Comments