शुभम हत्याकांड | आरोपीची नार्को टेस्ट का नाही ?

PCR च्या शेवटच्या दिवशी रहस्या वरून पर्दा उठतो की झाकून राहतो

घुग्घूस : तरुणाईत पसरलेली व्यसनाधीनता कमी श्रमात लवकर श्रीमंत होणे तसेच वेबसिरीजचे अपराधीक चित्रीकरण व प्रसारण युवकांना गुन्हेगारीच्या जाळ्यात ओढत आहे.
अभियांत्रिकीचे दोन विद्यार्थी मित्र एक मृतक तर एक आरोपी ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना अजून ही उत्तर शोधत आहे.

 शुभम यांची हत्या होऊन जवळपास आठवडा ओलांडला असून उद्या आरोपी  गणेश पिपळशेंडे यांची प्रथम चार दिवसांची व नंतर दोन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड संपत आहे.

मात्र अजून पर्यंत या प्रकरणाचा पूर्ण उलगडा झाला नसून आरोपी वारंवार आपले बयान बदलून पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे निरदर्शनास येत आहे.

मात्र खालील प्रश्न अनुत्तरीत असून या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी नार्को टेस्ट घेणे आवश्यक आहे.

शुभमची हत्या नेमकी कुठे झाली ?

हत्येत अजून किती आरोपी सहभागी आहे ?

शव घटनास्थळी मिळाले त्याच ठिकाणी हत्या करण्यात आली किंवा इतर ठिकाणी हत्या करून मृतदेह त्याठिकाणी आणून टाकले ?

मृतदेह आणून टाकले ते वाहन कोणते ?

हत्याकांड काळातील आरोपीच्या मोबाईल लोकेशन व संपर्कात असलेले लोकांचे कॉल डीटेल्स घेतले काय ?

आज तंत्रज्ञान इतके आधुनिक असतांना 28 दिवसा पर्यंत शुभमची माहिती अथवा मृतदेह मिळाला का नाही ?

असे अनेक प्रश्न अजून ही गुलदस्त्यात आहे
याचे उत्तर येणारा काळच संगेल.



Post a Comment

0 Comments