सारीका चटकी यांना गोंडवाना विद्यापीठ तर्फे पी.एच.डी. पदवीचा सन्मान

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ तर्फे पी.एच.डी. (आचार्य) कामर्स मॅनेजमेंट या विषयातील “ Recent Trends in Recruitment Selection Procedure of Industries in Vidarbha Region” सारीका बबन नांदे(चटकी) यावर “शोध प्रबंध” सादर केला होता. त्यांना गोंडवाना विद्यापीठा तर्फे पी.एच.डी. (आचार्य) पदवीचा सन्मान प्रदान केला गेला. 

या शोध कार्यात सौ लिना कीशोर मामीडवार इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज एन्ड रिसर्च कोसारा चंद्रपूर चे प्राचार्य डॉ. जयेश चक्रवर्ती सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या संशोधन कार्यात सहकार्य दिलेल्या सर्व मान्यवरांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे नागपूरयेथून प्रकाशित होत असलेल्या “साप्ताहिक पोलिस डायरी चे जिल्हा प्रतिनिधी व दिशानी फायर कन्टोर्ल आफ इंडिया प्रायवेट लिमिटेड चे डायरेक्टर सुनिल चटकी यांच्या त्या पत्नी आहे.


Post a Comment

0 Comments