पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी ताडोबातील मुक्काम हलविला



• आमदार नितेश राणेंचा ताडोबातील पर्यटनाबाबत घेतला चिमटा

चंद्रपूर : तिन दिवसांकरिता ताडोबाच्या मुक्कामी आलेले राज्याचे पर्यावरण मंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे पर्यटनवारीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी, आपल्या ट्विटद्वारे चिमटा घेतल्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज बुधवारी आपला ताडोबातील मुक्काम हलविला आहे. आज बुधवारी ते मुंबईला रवाना झाले आहे.

ताडोबा अभयारण्यात राज्याचे पर्यावरण मंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे सोमवारी ताडोबा अभयारण्यात पर्यटनाच्या दृष्टीने आले होते. ते ताडोबात मुक्कामी असल्याबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. दोन दिवस त्यांनी ताडोबातील वेगवेगळया गेटद्वारे त्यांनी पर्यटनाचा आनंद घेतला. दोन दिवसाचा मुक्काम ताडोबात झाल्यांनतर आज बुधवारी त्यांनी ताडोबातील आपला मुक्काम हलविला आहे. १५ मार्च रोजी ते मुंबईहून नागपुरात आले. तिथून थेट चिमूर मार्गे ताडोबात गेले. मात्र, या दौऱ्याबतात कुठेही नोंद नाही. त्यांना शासकीय दौरा नव्हता. त्यामुळे अधिकारी, पक्ष कार्यकर्ते याना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. दरम्यान या ताडोबा दौऱ्याबाबत नितेश राणे यांनी टीका केल्यानंतर हा दौरा झाल्याचे बिंग फुटले. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे काही दिवसांपासून “ताडोबा” मध्ये सुट्टी घालण्यात व्यस्त आहेत ? मुंबईला मग कोण वाचवेल? अशी टीका राणे यांनी केल्यानंतर त्यांनी आज बुधवारी ताडोबातून आपला मुक्कात मुंबईला हलविला आहे.

Post a Comment

0 Comments