राजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी



घुग्घुस : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णाची संख्या मूळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला असून रक्तपेटीत ही रक्ताचा तुटवडा होत असून कोरोना संक्रमित रुग्णाला व त्यांच्या कुटुंबाला मदद करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा याकरीता 12 एप्रिल रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामीण जिल्ह्याध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या माध्यमातून कार्यकर्त्याची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा मीटिंग घेण्यात आली.

यामध्ये घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुस येथील वाढत्या कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता चिंता व्यक्त केली.

मोठा वाजा - गाजा करून माजी केंद्रीय मंत्री यांनी केंद्रीय रुग्णालय म्हणून नामकरण करण्यात आलेला राजीव रतन रुग्णालय हा पांढरा हत्ती सिद्ध झालेला आहे. वेकोली कर्मचारी व प्रसिद्ध व्यवसायिक नामांकित वेटलिफ्टर नागेश कोंडगुर्ला यांना कोविड मुळे आपला जीव गमवावा लागला हा अत्यंत क्लेशदायक प्रकार असून वेकोलीला लाज वाटायला हवी ?

अश्या शब्दात नाराजी व्यक्त करून पन्नास हजार लोकसंख्या असलेला घुग्घुस व परिसरातील पन्नास हजार असे ऐकून एक लाख लोकसंख्येला लक्षात घेता वेकोलीच्या राजीव रतन रुग्णालयात शंभर खाटांचा कोविड रुग्णालय उभारून त्यामध्ये दहा व्हेंटिलेटर व सर्व सोयीयुक्त रुग्णालय तातळीने निर्माण करावा अशी मागणी रेड्डी यांनी केली आहे.

घुग्घुस येथे सध्या परिस्थितीत 270 कोरोना रुग्ण मिळाले आहेत.

Post a Comment

0 Comments